गाडे यांचा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST2021-06-01T04:16:42+5:302021-06-01T04:16:42+5:30

अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर येणारे अन्नधान्य व इतर माल वाहतूक करण्यासाठी शहरातून जावे लागत असल्याने ट्रान्सपोर्टच्या अनेक वाहनांवर पोलीस दंडात्मक ...

Gade felicitated on behalf of Transport Association | गाडे यांचा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सत्कार

गाडे यांचा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सत्कार

अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर येणारे अन्नधान्य व इतर माल वाहतूक करण्यासाठी शहरातून जावे लागत असल्याने ट्रान्सपोर्टच्या अनेक वाहनांवर पोलीस दंडात्मक कारवाई करत होते. याशिवाय इतरही अडचणी होत्या. त्यामुळे ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत गाडे यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून चर्चा केली. या चर्चेमध्ये श्रीगोंदा येथे मालधक्का चालू करण्याची मागणी करण्यात आली होती व ही मागणी मान्य झाली. त्यामुळे ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने उद्योजक करीम हुंडेकरी, भरत ठाणगे, गुरवेंदरसिंग वाही, रामराव मुनफन, रामभाऊ कोतकर, ज्ञानेश्वर ठाणगे, युवराज गाडे आदींनी गाडे यांचा सत्कार केला. श्रीगोंदा येथे साखर कारखाने जवळ असल्याने धक्क्यावर साखर मोठ्या प्रमाणावर आयात होणार आहे, या हेतूने मालधक्का चालू करण्यात आला आहे, तसेच राहुरी व विळद घाट येथे मालधक्का चालू करण्यात यावा, अशीदेखील मागणी करण्यात आली आहे.

-------

३१गाडे सत्कार

ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने रमाकांत गाडे यांचा सत्कार करताना उद्योजक करीम हुंडेकरी, भरत ठाणगे, गुरवेंदरसिंग वाही, रामराव मुनफन, रामभाऊ कोतकर, ज्ञानेश्वर ठाणगे, युवराज गाडे आदी.

Web Title: Gade felicitated on behalf of Transport Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.