कांद्याचा ट्रक पळविल्यासंदर्भात राहुरी तहसील कार्यालयासमोर गावक-यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 20:15 IST2018-02-22T20:14:59+5:302018-02-22T20:15:18+5:30
साडेचारशे गोण्या भरलेला कांद्याचा ट्रक पळवून नेल्याप्रकरणी अर्जुन जाधव व कणगर-मल्हारवाडी परिसरातील शेतकरी राहुरी तहसीलदार कचेरीसमोर आजपासून आमरण उपोषणाला बसले.

कांद्याचा ट्रक पळविल्यासंदर्भात राहुरी तहसील कार्यालयासमोर गावक-यांचे उपोषण
राहुरी : साडेचारशे गोण्या भरलेला कांद्याचा ट्रक पळवून नेल्याप्रकरणी अर्जुन जाधव व कणगर-मल्हारवाडी परिसरातील शेतकरी राहुरी तहसीलदार कचेरीसमोर आजपासून आमरण उपोषणाला बसले. आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
कांद्याने भरलेला ट्रक शाम गाडे व अन्य लोकांनी लुटला़ यासंदर्भात अर्जुन जाधव यांनी राहुरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. १९ फेब्रुवारी रोजी तक्रार करूनही पोलिसांनी दखल न घेतल्याने आपण आजपासून आमरण उपोषण सुरू केल्याचे अर्जुन जाधव यांनी सांगितले़ उपोषणामध्ये चंद्रभान जाधव, विश्वनाथ जाधव, काशिनाथ जाधव, देवराम सागर, एकनाथ जाधव, नारायण जाधव, बाबासाहेब गागरे, बाबासाहेब गाढे, सिताराम म्हस्के सहभागी झाले आहे.