शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

फसव्या सरकारविरोधात जनतेचा रोष - सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:02 IST

कर्जमाफीच्या रकमा, बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. राष्ट्रवादीने सुरु केलेल्या आंदोलनानंतर कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारने केला. आता फसव्या सरकारच्या विरोधातील रोष संघटित होत आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

अहमदनगर : कर्जमाफीच्या रकमा, बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. राष्ट्रवादीने सुरु केलेल्या आंदोलनानंतर कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारने केला. आता फसव्या सरकारच्या विरोधातील रोष संघटित होत आहे, असे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.हल्लाबोल यात्रेला नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून आज, बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. तटकरे म्हणाले, सरकारचे अजूनही डोळे उघडत नाहीत. कापसाच्या नुकसानीचे पैसे सरकारकडून अद्याप मिळालेले नाहीत. सरकार शेतक-यांसाठी काहीही करीत नाही. सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनाचा हा तिसरा टप्पा आहे.रोजगार न मिळाल्यामुळे सरकारकडून तरुणांची फसवणूक होत आहे, अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दीडपट हमीभाव, दोन कोटी रोजगार ही सर्व फसवी आश्वासने आहेत. सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात जनमानस एकवटत आहे. आता आम्ही विभागीय आयुक्तालयावर हल्लाबोल करणार आहोत, असे तटकरे यांनी सांगितले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसेपाटील, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते.

पाथर्डीमध्ये पीआयनेच कट रचला. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. राज्याला मागे नेणारे भाजप सरकारचे काम करीत आहे. सध्या आठ लाख कोटी कर्ज राज्यावर झाले आहे. उत्पन्न घटले आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर टीका केली.पवार म्हणाले, जे जे पक्ष येतील, त्यांना मान दिला जाईल. भाजप - सेना हाच प्रमुख विरोधक आहे. जिल्हा विभाजन सोपे नाही़ त्यासाठी आर्थिक भार सोसण्याची ताकद सरकारची असावी लागते़ जिल्हा विभाजन हा चुनावी जुमला आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा डाव आहे. चार वर्षात सरकारने काय दिवे लावले ते सांगा, कोणते आश्वासन पाळले, ते सांगा़ फक्त आपल्या देशात पेट्रोल महाग आहे. या सरकारवरचा सगळ्यांचा विश्वास उडाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस