कोविड सेेंटरसाठी जमवला ३ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST2021-05-19T04:20:27+5:302021-05-19T04:20:27+5:30
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सहारा शासकीय कोविड सेंटरला ४ फॅन व ५ ऑक्सिमीटर व राहुरी शहरातील बालाजी ...

कोविड सेेंटरसाठी जमवला ३ लाखांचा निधी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सहारा शासकीय कोविड सेंटरला ४ फॅन व ५ ऑक्सिमीटर व राहुरी शहरातील बालाजी मंदिर शासकीय कोविड सेंटरला त्यांच्या मागणीनुसार २० बाॅक्स हँडग्लोव्हज व २० बाॅक्स ऑक्सिमास्क देण्यात आले. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात उत्तरदायित्व व सामाजिक जाणिवेतून राहुरी मुख्याध्यापक संघाने माध्यमिक व आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेतर वृंदाच्या मदतीने कोविड मदत निधी गोळा केला. ३ लाख २१ हजारांचा निधी गोळा झाला. त्यातूनच राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सहारा शासकीय कोविड सेंटरने कडाक्याच्या उन्हात रुग्णांना आरामदायी वाटावे म्हणून ४ फॅन व ५ ऑक्सिमीटरची मागणी केली. त्यानुसार मुख्याध्यापक संघाने या वस्तू ताबडतोब गटशिक्षणधिकारी सूर्यवंशी व समाजसेवक आप्पासाहेब ढुस यांच्या हस्ते कोविड सेंटरला भेट देण्यात आल्या. तसेच राहुरी शहरातील बालाजी मंदिर शासकीय कोविड सेंटरला त्यांच्या मागणीनुसार २० बाॅक्स हँडग्लोव्हज व २० बाॅक्स ऑक्सिमास्क मुख्याध्यापक निवृत्ती ईले, मुख्याध्यापक मंगेश पगारे, मुख्याध्यापक जगन्नाथ सूर्यवंशी व मुख्याध्यापक कैलास आनाप व सुहास महाजन यांच्या हस्ते डाॅ. शेळके यांच्याकडे कोविड सेंटरसाठी सोपविण्यात आल्या. सडे येथील कोविड सेंटरला तीन स्टँड फॅन व ३ ऑक्सिमीटर त्यांच्या मागणीनुसार उपसरपंच लहारे व ग्रामसेवक जंगम यांच्याकडे सोपविण्यात आले. कोविड सेंटरला मदत हवी असल्यास त्या सेंटरने राहुरी मुख्याध्यापक संघाकडे मागणी करावी, असे आवाहन राहुरी मुख्याध्यापक संघाने केले आहे.