टाकळीभानसाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:21+5:302021-09-02T04:45:21+5:30
टाकळीभान येथील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच कानडे यांची भेट घेतली. निधी नसल्याने गावाचा विकास रखडल्याने प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ...

टाकळीभानसाठी निधी कमी पडू देणार नाही
टाकळीभान येथील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच कानडे यांची भेट घेतली. निधी नसल्याने गावाचा विकास रखडल्याने प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन कानडे यांना दिले. या वेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णुपंत खंडागळे, भारत भवार, राजेंद्र कोकणे, विलास दाभाडे, कार्लस साठे हे उपस्थित होते.
टाकळीभान ते बेलपिंपळगाव, टाकळीभान-कारेगाव, टाकळीभान-मुठेवाडगाव या दळणवळणाच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, टाकळीभान कमानीपासून घोगरगाव रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण करणे, तीर्थक्षेत्र विकासात महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, बुद्धविहार, संत सावता महाराज मंदिर, श्री साईबाबा मंदिर यांचा विकास करणे, आदिवासी स्मशानभूमीसाठी जागा, कब्रस्तानमधील प्रार्थनास्थळाचा विकास, अतिरिक्त भारनियमनासाठी वाढीव रोहित्र, गणेशखिंड वीज उपकेंद्राची क्षमता वाढवणे, टाकळीभानच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २४ तास वीजपुरवठा यासह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. कानडे यांनी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत विकासासाठी टाकळीभान गाव दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन कानडे यांनी देत व्यायाम शाळेसाठी ५ लाखांचे साहित्य उपलब्ध करून दिले.