ग्रामीण आरोग्य केंद्रांना निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:02+5:302021-05-01T04:19:02+5:30
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला ४५ रुग्णवाहिका मिळणार आहेत; परंतु या रुग्णवाहिका गरज आहे त्याच आरोग्य ...

ग्रामीण आरोग्य केंद्रांना निधी द्या
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला ४५ रुग्णवाहिका मिळणार आहेत; परंतु या रुग्णवाहिका गरज आहे त्याच आरोग्य केंद्रांना वाटप व्हाव्यात, उगाच बळी तो कानपिळी असे बाकीच्या विकास कामाच्या वाटपात दिसले तसे व्हायला नको, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे. चौदावा वित्त आयोगाच्या व्याजाचे अजून वीस-बावीस कोटी रुपये शिल्लक आहेत. ते या कोरोना महामारीत वापरायला हवे. संपूर्ण ग्रामीण भागातील आरोग्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची आहे; पण ग्रामीण भागातील रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी चांगले काम करतात; पण बऱ्याच ठिकाणी त्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पुरेसा औषधसाठा नाही, वाहने नाही, लस नाही, तपासणी किट नाही, उपचाराचे संसाधन नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. जिल्हा नियोजनमधील ३२ कोटींचा निधी अजून शिल्लक आहे. अकोल्यासारख्या ग्रामीण भागातील कोविड सेंटरवर औषधांचा साठा कमी आहे. लोकवर्गणी काढून तेथे औषधे घावी लागतात, मग हा कोरोनासाठी नियोजन समितीचा निधी ग्रामीण भागात का दिला जात नाही, असा सवाल वाकचौरे यांनी केला आहे.