तासात होणार टाटाच्या बॅटरीवरील चारचाकीचे फूल चार्जिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:27 IST2021-02-05T06:27:52+5:302021-02-05T06:27:52+5:30

शोरुमचे ज्येष्ठ संचालक प्रभू कराचीवाला यांच्या हस्ते या पॉईंटचे पूजन झाले. याप्रसंगी टाटा मॅक्स शोरूमचे संचालक निखिल कराचीवाला, ...

Full charging of four-wheelers on Tata batteries in an hour | तासात होणार टाटाच्या बॅटरीवरील चारचाकीचे फूल चार्जिंग

तासात होणार टाटाच्या बॅटरीवरील चारचाकीचे फूल चार्जिंग

शोरुमचे ज्येष्ठ संचालक प्रभू कराचीवाला यांच्या हस्ते या पॉईंटचे पूजन झाले. याप्रसंगी टाटा मॅक्स शोरूमचे संचालक निखिल कराचीवाला, सेल्स मॅनेजर इरफान शेख, मानव संसाधन विभागाचे प्रमुख सुभाष कबाडी व ग्राहक उपस्थित होते. संचालक कराचीवाला म्हणाले, सुरुवातीला ही सेवा विनामूल्य असून नंतर कंपनीच्या निर्देशानुसार दर आकारले जातील. येथे चारचाकी अवघ्या एका तासांमध्ये फूल चार्ज होणार असून ती २१० ते २३० किलोमीटरपर्यंत चालेल. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर येथे असे पॉईंट कार्यान्वित करण्यात आले आहेत. कंपनीने एक अ‍ॅप विकसित केलेले असून, प्रवास करताना काही अंतरावरच आपल्याला चार्जिंग पॉईंटची सेवा उपलब्ध असल्याचा संदेश गाडीमध्ये येतो, त्यामुळे संबंधितांची चार्जिंगबाबत गैरसोय टळणार आहे. (वा.प्र.)

------

फोटो -२७टाटा मोटर्स

चारचाकीसाठीच्या इलेक्ट्रिक कार फास्ट चार्जिंग पॉईंट स्टेशन सेवेचा शुभारंभ नगर-मनमाड रस्त्यावरील टाटा मॅक्स मोटर्स येथे करतान प्रभू कराचीवाला, निखिल कराचीवाला, इरफान शेख, सुभाष कबाडी आदी.

Web Title: Full charging of four-wheelers on Tata batteries in an hour