फरार आरोपी सापडेना... सापडलेला अटक होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:21 IST2021-02-10T04:21:46+5:302021-02-10T04:21:46+5:30

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपी अतुल उर्फ बबन भाऊसाहेब घावटे (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतल्यानंतर केवळ चौकशी करून एलसीबीने ...

Fugitive accused not found ... No arrest made | फरार आरोपी सापडेना... सापडलेला अटक होईना

फरार आरोपी सापडेना... सापडलेला अटक होईना

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपी अतुल उर्फ बबन भाऊसाहेब घावटे (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतल्यानंतर केवळ चौकशी करून एलसीबीने त्याला सोडून दिले. घावटे याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई झाल्याचे प्रसिद्धीपत्रक पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून ते त्यांच्या संकेतस्थळावरही अपलोड केलेले आहे. घावटे हा सराईत गुन्हेगार असल्याचे नगर आणि पुणे पोलिसांना त्याच्या गुन्ह्यांबाबत चांगलीच माहिती आहे. असे असताना एलसीबीच त्याच्या मोक्काच्या गुन्ह्याबाबत अनभिज्ञ कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करणे, गुन्ह्यांचा शोध घेणे हेच स्थानिक गुन्हे शाखेचे मुख्य काम आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे राज्यभरात नेटवर्क असते. त्यामुळे त्यांच्या नजरेतून सहजासहजी आरोपी सुटू शकत नाही. येथे मात्र ताब्यात घेतलेला आरोपी सहीसलामत सुटतो. याच्यामागचे काहीतरी कारण आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्याकडे खुलासा मागितला आहे. आता ते काय खुलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Fugitive accused not found ... No arrest made