शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साई संस्थानचे विदेशी चलनाचे खाते गोठविले, तिरूपती बालाजी देवस्थानचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 10:28 IST

Sai Sansthan News: विदेशी योगदान (नियमन) कायद्यानुसार वेळेत नूतनीकरण न झाल्याने साई संस्थानचे विदेशी चलनाचे खाते केंद्रीय गृहमंत्रालयाने १ जानेवारीपासून गोठविले आहे. यामुळे संस्थानचे कोट्यवधींचे चलन अडकून पडले आहे.

- प्रमोद आहेर शिर्डी : विदेशी योगदान (नियमन) कायद्यानुसार वेळेत नूतनीकरण न झाल्याने साई संस्थानचे विदेशी चलनाचे खाते केंद्रीय गृहमंत्रालयाने १ जानेवारीपासून गोठविले आहे. यामुळे संस्थानचे कोट्यवधींचे चलन अडकून पडले आहे.देशभरातील जवळपास सहा हजार व महाराष्ट्रातील १ हजार २६३ अशासकीय संस्थांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एफसीआरए कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत खात्याचे नूतनीकरण न केल्याने ही कारवाई करण्यात आली. यात साई संस्थानसह तिरूपती देवस्थानाचाही समावेश आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना विदेशातून आर्थिक मदत मिळते. खाती गोठविल्याने मदतीचा ओघ थांबला आहे.साई संस्थानचा तात्पुरता कारभार तदर्थ समितीकडे होता. नूतनीकरणासाठी पदाधिकाऱ्यांची केवायसी उपलब्ध न झाल्याने नूतनीकरण रखडल्याचे सांगण्यात येते. नवीन व्यवस्थापन आल्यानंतर सर्व विश्वस्तांची केवायसी करून २५ डिसेंबरला संस्थानने नूतनीकरणासाठी अर्ज दाखल केला. मात्र, आयबीकडून पडताळणी प्रलंबित असल्याने संस्थानचेही खाते गोठविण्यात आले. लवकरच हे खाते कार्यान्वित होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले़केंद्रीय गृहमंत्रालयाने विदेशी चलनाबाबत कायद्यात बदल केले आहेत. त्यानुसार जुलै महिन्यापासून परकीय चलनाबरोबरच दात्याचा ओळखीचा पुरावाही सादर करावा लागतो. संस्थानच्या देणगी कक्षात परकीय चलनाचे दान देणाऱ्या देणगीदारांकडून त्यांच्या पासपोर्टची छायांकित प्रत घेण्यात येत आहे. अनेक जण ती देण्यास टाळाटाळ करतात. याशिवाय अनेक विदेशी चलनाचे चेक पोस्टाने येतात. त्यांनाही उलट टपाली ओळखपत्रांचा पुरावा सादर करण्यास सांगण्यात येत आहे. अनेक देणगीदारांनी असा पुरावा सादर करण्यास नकारही दिल्याचे कळते.विशेष म्हणजे दानपेटीतही मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन निघत असते. या चलनाचा दाता निश्चित करणे अवघड असल्याने या चलनाचे काय करावे, असा प्रश्न संस्थान समोर आहे. साई संस्थानने महिनाभरात केंद्रीय गृहमंत्रालयाशी याबाबत दोनदा पत्रव्यवहार केला आहे.

टॅग्स :shirdiशिर्डीMumbaiमुंबई