मैत्रीचे बंध...गजबजणारा कट्टा...!
By Admin | Updated: August 3, 2014 01:10 IST2014-08-03T00:15:22+5:302014-08-03T01:10:27+5:30
अहमदनगर : आज रविवार, कॉलेजला सुट्टी, तरीही आवरायची घाई... संपूर्ण मार्केट बंद असलं तरी भेटवस्तूची दुकाने भल्या सकाळीच उघडलेली... थोड्याच वेळात एक एकजण जमणार... सुट्टी असली तरीही कट्टा गजबजणार...!
मैत्रीचे बंध...गजबजणारा कट्टा...!
अहमदनगर : आज रविवार, कॉलेजला सुट्टी, तरीही आवरायची घाई... संपूर्ण मार्केट बंद असलं तरी भेटवस्तूची दुकाने भल्या सकाळीच उघडलेली... थोड्याच वेळात एक एकजण जमणार... सुट्टी असली तरीही कट्टा गजबजणार...!
आहेत त्यांना जपणारा, नव्यांना सामावून घेणारा आणि जे नाहीत त्यांची आठवण जागवणारा दिवस म्हणजे ‘फे्रं डशीप डे...’ आॅगस्ट महिन्यातला पहिला रविवार देशभर मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, तसेच इतर खासगी क्षेत्रातील सर्वचजण या दिवसासाठी खास वेळ राखून ठेवतात. कॉलेज कट्ट्यावर नेहमीपेक्षा आज जरा जास्तच उत्साह असणार आहे. फ्रेंडशीप बॅण्डने हात भरून जाईल. शुभेच्छा देता-घेता दमछाक होईल, मोबाईलचा ईनबॉक्स फुल्ल भरेल, व्हॉटस्अपचा टोन दिवसभर खणकेल...
तरूणाईने आपापल्या पद्घतीने या दिवसाचे पूर्ण प्लॅनिंग करून ठेवले आहे. त्यासाठीची खास शॉपिंग, शुभेच्छा संदेश, खास भेटवस्तूंचे नियोजन झाले आहे. ज्यांना भेटण्याचं कमिट केलंय ते तर भेटणारच, पण जे दूर आहेत, त्यांना जवळ आणणारे खास संदेश नेटवरून अपलोड झाले आहेत. शनिवारी रात्री बरोबर १२ वाजता काहींनी ते व्हॉटस्अपवरून शेअर केले, तर काही ते रविवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरवतील.
लांबचा पल्ला गाठताना
दूर दूर जाताना, दु:ख खोडायला
नवे नाते जोडायला, ठेच लागता सावरायला
मी असेन तुझ्याबरोबर नेहमीच
तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला
- योगेश शिर्के, सावेडी
जीवनाच्या वाटेवर चालताना
कधी भेटलास तू ...
सोबती चालताना
अर्थ जगण्याचा शिकवलास तू...
कधी वाटेल भीती एकटे होण्याची
मित्रा फक्त मागे वळून बघ
तुझ्या पाठी असेन मी...
- अनिल निमसे, नगर