मालवाहू ट्रक-कंटेनरचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:10+5:302021-09-02T04:46:10+5:30
अरुंद पुला दरम्यान अपघातांचा सिलसिला सुरूच असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

मालवाहू ट्रक-कंटेनरचा अपघात
अरुंद पुला दरम्यान अपघातांचा सिलसिला सुरूच असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने नाशिककडून नगरच्या दिशेने चालक अंकित राजभर हा मालवाहू कंटेनरमधून (डी. एन. ०९, एन ९४०० ) इलेक्ट्राॅनिक साहित्य घेऊन जात होता. तर नगरहून नाशिकच्या दिशेने रिकामा मालट्रक (युपी ६३, टी ९७९८) जात होता. मालवाहू ट्रक व कंटेनरची तळेगाव दिघे बाजार तळानजीक पुलादरम्यान पश्चिमेच्या बाजूस अपघाती वळणावर धडक होत अपघात झाला. अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्याकडेला पुलाच्या साईड गटारात अडकला. अपघातातून कंटेनरचालक अंकित राजधर व क्लिनर अन्सूल राजधर ( दोघेही रा. जोनपूर, उत्तरप्रदेश ) व मालवाहू ट्रक चालक ( नाव सांगितले नाही. ) असे तिघे जण बचावले.