जिल्हा रुग्णालयात मोफत जेवण वाटपाची परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:34+5:302021-04-29T04:16:34+5:30
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याची तयारी असून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ...

जिल्हा रुग्णालयात मोफत जेवण वाटपाची परवानगी मिळावी
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याची तयारी असून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कृष्णा भोजनालयाचे संचालक साईनाथ घोरपडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.
कृष्णा भोजनालयाच्या वतीने मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये गरजूंना मोफत भोजन देण्यात आले. या वर्षीही मोठ्या प्रमाणात रुग्ण जिल्हा रुग्णालयामध्ये येत आहेत. रुग्णांना भोजनाची व्यवस्था होते, मात्र त्यांच्या नातेवाईकांचे भोजनाअभावी मोठे हाल होतात. लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर १०० गरजूंना रोज मोफत भोजन देण्यास आपण तयार आहोत, परंतु त्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालय आवारात थोडी जागा तसेच भोजन वाटप याची परवानगी द्यावी, अशी मागणी घोरपडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.
हे पत्र देऊन बारा दिवस झाले; मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून घोरपडे यांना काहीही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. गरजूंना मोफत भोजन देण्याचे दातृत्व घोरपडे दाखवत आहेत; मात्र प्रशासनाच्या थोड्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी केली आहे. यातून बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची रात्रीच्या तसेच दिवसाच्या भोजनाची सोय होणार आहे. त्यामुळे ही परवानगी मिळावी, असेही घोरपडे यांनी पत्रात म्हटले आहे.
--------------