वस्तू विकण्याच्या नावाखाली २३ लाखाला फसविले
By Admin | Updated: June 24, 2016 01:15 IST2016-06-24T00:44:16+5:302016-06-24T01:15:32+5:30
नेवासा : तालुक्यातील चिलेखनवाडी परिसरात खोटी कंपनी तयार करून वस्तू विकणे आहे असे सांगून तुम्ही कंपनीच्या वस्तू विकल्यावर तुम्हाला ५०० कोटी रुपये

वस्तू विकण्याच्या नावाखाली २३ लाखाला फसविले
नेवासा : तालुक्यातील चिलेखनवाडी परिसरात खोटी कंपनी तयार करून वस्तू विकणे आहे असे सांगून तुम्ही कंपनीच्या वस्तू विकल्यावर तुम्हाला ५०० कोटी रुपये देऊ असे सांगून २३ लाख रुपयाला फसविण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी नेवासा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी शरद काशिनाथ घोडेकर (वय ४२, रा.निमगाव जाळी, ता.संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संजय सावंत (रा.चिलेखवाडी, ता.नेवासा), अनिल देवडे (रा. खाटकवाडी, ता.नेवासा), फिरोज सलमान शेख ऊर्फ यश पवार (रा.फकराबाद, जामखेड), विनोद उबाळे ऊर्फ विनोद पवाार (रा.फकराबाद, जामखेड), राजेश चव्हाण (रा.महंमदवाडी, पुणे), कल्पतरु मिश्रा (रा.पुणे), मंगेश पटेल (रा.मालवाड, मुंबई) यांचे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटले आहे, या सर्व आरोपींनी संगनमत करून एक खोटी कंपनी तयार करून आमचेकडे असलेले अॅन्टीक वस्तू (आर.पी.) विकणे आहे व त्यासाठी तुम्ही कंपनीची फी द्या आम्ही वस्तू विकल्यावर त्याचा मोबदला पाचशे कोटी रुपये देऊ असे सांगून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना खोटे आमिष दाखवून २३ लाख रुपयाला फसविले. हा प्रकार सुमारे तीन महिन्यापासून ते १५ जून २०१६ रोजी रात्री ९-३० वाजे दरम्यान आरोपी संजय सावंत यांच्या चिलेखनवाडी येथील घरात घडला असे या फिर्यादीत दाखल करण्यात आले आहे. सदरचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात बुधवार, २२ जून रोजी दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे हे करीत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)