भाळवणी कोविड सेंटरमधील चौदाशे रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:01+5:302021-05-07T04:21:01+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरातील (कोविड सेंटर) दोन हजार कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ हजार ४१५ ...

Fourteen hundred patients at Bhalwani Kovid Center overcome corona | भाळवणी कोविड सेंटरमधील चौदाशे रुग्णांची कोरोनावर मात

भाळवणी कोविड सेंटरमधील चौदाशे रुग्णांची कोरोनावर मात

सुपा : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरातील (कोविड सेंटर) दोन हजार कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ हजार ४१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती येथील नोडल ऑफिसर डॉ. मनीषा माणूरकर यांनी दिली. उर्वरितांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील नियोजनासाठी आमदार नीलेश लंके हे सेंटरमध्येच ठाण मांडून आहेत.

नीलेश लंके यांनी भाळवणी येथे मागील महिन्यात अकराशे बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. लंके हे दिवसरात्र येथच थांबून आहेत. येथील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर बाधित रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणे, त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे, त्यांच्याशी चर्चा करून काय त्रास होत आहे हे जाणून घेणे. यातून तुम्हाला नक्की बरं करणार ही आत्मविश्वासाची भावना त्यांच्या मनात बळकट करणे, ही कामे स्वतः आमदार लंके करीत आहेत. त्यामुळे रुग्णांमध्येही सकारात्मकता निर्माण होत आहेत. त्यातून त्यांना कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यास बळ मिळत आहे.

लंके यांनी निर्माण केलेल्या सकारात्मक वातावरणाने परिणामी भाळवणीच्या आरोग्य मंदिरात कोरोनालाही माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात घरवापसी करणाऱ्या परप्रांतीय, दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिक, पायी घराकडे चाललेले, अन्न, पाण्यासाठी कासावीस झालेल्या जिवांसाठी सुप्यात मोफत भोजन व्यवस्था करतानाही लंके केवळ कार्यकर्ते करतील म्हणून त्यांच्यावर विसंबून न राहता स्वतः तेथे थांबून होते.

---

योगासने, व्यायामाकडेही आमदारांचे लक्ष..

यंदाही आमदार नीलेश लंके भाळवणीच्या कोविड केअर सेंटरमध्येच राहत आहेत. सामान्यांप्रमाणेच तेथेच ते जमिनीवर झोपत आहेत. रुग्णांवर केवळ औषधोपचारच करत नाहीत, तर त्यांच्या मनोरंजनाची व्यवस्था केली आहे. योगासने व व्यायाम, आहार, विश्रांती याकडेही लंके हे स्वत: लक्ष देतात, असेही डॉ. माणूरकर यांनी सांगितले.

---

०६भाळवणी कोविड

भाळवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे रुग्ण.

Web Title: Fourteen hundred patients at Bhalwani Kovid Center overcome corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.