आॅनलाइन लोकमतचिचोंडी पाटील (अहमदनगर), दि़ ५ - नगर तालुक्यातील भातोडी येथे रोजगार हमी योजनेतून अल्पभुधारक शेतकऱ्यांना चार विहिरी मंजूर झाल्या आहेत़जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे व उपसभापती प्रविण कोकाटे यांच्या हस्ते या विहिरींच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले़ या विहिरींसाठी २ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ शासकीय योजना जनतेच्या हितासाठी असून, त्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहणार आहोत, असे मत कोकाटे यांनी व्यक्त केले़ यावेळी पंचायत समिती सदस्य संदीप पुंड, सरपंच भरत लबडे, राजू पटेल, बाबासाहेब नेटके, सिकंदर मुलानी, ग्रामसेवक लोखंडे, निसार शेख आदी उपस्थित होते़
रोहयोतून चार विहीरींना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 15:07 IST