चार दरोडेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:19 IST2019-01-30T12:19:21+5:302019-01-30T12:19:55+5:30

पारनेर तालुक्यातील धोत्रे शिवारात भिवंडी येथील नागरिकांवर हल्ला करून त्यांच्याकडील २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री सुपा परिसरातून अटक केली़

Four robbers arrested | चार दरोडेखोरांना अटक

चार दरोडेखोरांना अटक

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील धोत्रे शिवारात भिवंडी येथील नागरिकांवर हल्ला करून त्यांच्याकडील २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री सुपा परिसरातून अटक केली़
किशोर मंत्र्या चव्हाण, किरण दगडू भोसले, साईनाथ गजानन काळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली़ २७ जानेवारी रोजी भिवंडी (रा़ मानकोली) येथील शिवनाथ गणेश भोईर, शाम बारक्या भोईर, करण आकाश भोईर व राजकुमार रतनचंद बुढाई हे धोत्रे येथे बकºया विकत घेण्यासाठी आले होते़ यावेळी दहा ते बारा जणांनी या चार जणांना मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर मुद्देमाल लंपास केला होता़
याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ या गुन्ह्यातील आरोपी सुपा बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार सहाय्यक निरीक्षक रोहन खंडागळे, ज्ञानेश्वर फडतरे, गणेश इंगळे, सचिन खामगळ, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस नाईक भागीनाथ पंचमुखी, मल्लिकार्जुन बनकर, रविंद्र कर्डिले, दिगंबर कारखेले,योगेश सातपुते, सुनील चव्हाण, योगेश गोसावी, दीपक श्ािंदे, रविकिरण सोनटक्के, संदीप पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली़ अटक केलेले सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़ या आरोपींना पुढील कारवाईसाठी पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़

 

Web Title: Four robbers arrested