दरोड्याच्या तयारीतील चार जण जेरबंद
By Admin | Updated: September 30, 2014 23:21 IST2014-09-30T23:19:10+5:302014-09-30T23:21:40+5:30
अहमदनगर : दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना एम.आय.डी.सी. पोलिसांनी इमामपूर घाटात जेरबंद केले आहे.

दरोड्याच्या तयारीतील चार जण जेरबंद
अहमदनगर : दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना एम.आय.डी.सी. पोलिसांनी इमामपूर घाटात जेरबंद केले आहे.
इमामपूर घाटात रविवारी रात्री एम.आय.डी. सी. पोलिसांना एक वाहनातून संशयास्पदरित्या जात असणारे काही इसम दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी गाडीला आडवून त्यांची कसून चौकशी केली. कारमध्ये पोलिसांना कुऱ्हाड, गुप्ती, गज, लोखंडी दांडके,पाईप,चाकू अशी हत्यारे मिळून आली. यावरून ते दरोड्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. कारमधील सलीम नूरमहंमद शेख (रा. मुंबई), नरेश सुरेश गुजर (रा. मानखुर्द), सुनील क्रिष्णकुमार सिंग (रा. मानखुर्द), विकी बबन ढमके (रा. गोंधवनी रोड, श्रीरामपूर) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरोडा टाकण्यासाठी असलेल्या या टोळीत आणखी दोघे असून ते फरार आहेत. चौघा जणांविरुद्ध दरोड्याची तयारी करण्याबाबत एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)