सचिन कोतकरसह चौघांवर गुन्हा
By Admin | Updated: August 31, 2014 23:59 IST2014-08-31T23:34:53+5:302014-08-31T23:59:29+5:30
अहमदनगर : अशोक लांडे खून प्रकरणात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन कोतकरसह चौघांवर गुन्हा
अहमदनगर : अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी सचिन भानुदास कोतकर याने गुन्ह्यात वापरलेल्या काळ््या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा रंग बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शंकर विठ्ठलराव राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शंकर राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अशोक लांडे खून प्रकरणात सचिन कोतकर हा आरोपी आहे. या गुन्ह्यात कोतकर याने काळ््या रंगाची स्कॉर्पिओ (एम.एच.-१६, एस-०५) वापरली होती. या गाडीचा काळा रंग होता, तो पांढरा करण्यात आला आहे. यामुळे गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाची कोणतीही परवानगी न घेता वाहनाच्या रंगात बदल केला आहे. यामध्ये सचिन भानुदास कोतकर (रा. केडगाव, हल्ली रा. नवी मुंबई), अशोक भाऊ मुंगसे (रा. दहीगाव साकत), संतोष आजिनाथ बदरगे (रा. घोगरगाव) आणि गाडीला रंग देणारा अज्ञात पेंटर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा १९ मे २००८ ते २० सप्टेंबर २०११ या काळात घडलेला आहे. या प्रकरणी रविवारी (दि.३१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटा पुरावा सादर करून न्यायालयाची फसवणूक करणे, संगनमताने कट रचने, आरटीओची परवानगी न घेता गाडीचा रंग बदलणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)