माळीझाप शिवारात चार लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 18:52 IST2019-04-24T18:52:01+5:302019-04-24T18:52:59+5:30

निवडणूक काळातील कोरड्या दिवशी मंगळवारी शहरातील माळीझाप शिवारातील एका हॉटेलच्या मागे उसाच्या शेतात राज्य

Four lakhs of liquor seized in Malisop Shivar | माळीझाप शिवारात चार लाखांची दारू जप्त

माळीझाप शिवारात चार लाखांची दारू जप्त

अकोले : निवडणूक काळातील कोरड्या दिवशी मंगळवारी शहरातील माळीझाप शिवारातील एका हॉटेलच्या मागे उसाच्या शेतात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी एका कारमधून चार लाख ४ हजार ४० रुपयांची देशी, विदेशी दारू जप्त केली.
माळीझाप शिवारातील हॉटेल जय मल्हारच्या पाठीमागे उसाच्या शेतात ही कारवाई करण्यात आली.आरोपी श्रीकांत चौधरी यास जागेवर अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एस.डी.परदेशी, दुय्यम निरीक्षक आर.एल.कोकरे, पी.एस. कडभाने, संगीता जाधव, विपुल कर्पे, सुनील निमसे, अनिल मेंगाळ, तौसीफ शेख यांचे पथकाने ही कारवाई केली

 

Web Title: Four lakhs of liquor seized in Malisop Shivar