चार लाख रुपयांचा गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:20 IST2021-04-22T04:20:58+5:302021-04-22T04:20:58+5:30

श्रीरामपूर : शहरात गांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीला मुद्देमालासह पोलिसांनी बुधवारी अटक केली. चार लाख ६० हजार रुपयांचा गांजा ...

Four lakh rupees worth of cannabis was seized | चार लाख रुपयांचा गांजा पकडला

चार लाख रुपयांचा गांजा पकडला

श्रीरामपूर : शहरात गांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीला मुद्देमालासह पोलिसांनी बुधवारी अटक केली. चार लाख ६० हजार रुपयांचा गांजा कारवाईत जप्त करण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी ही कारवाई केली. आहे. देवकर वस्ती येथे एक इसम गांजा विक्री करण्याकरिता आल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तेथे पथकाने छापा टाकला. यात ४६ किलो गांजा व चार लाख रुपये किमतीची पिकअप, असा एकूण आठ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपी गणेश भास्कर सरोदे (वय ३८ देवकर वस्ती) याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, हवालदार जोसेफ साळवी, पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव, सुनील दिघे आदींनी कारवाई केली.

आरोपीने गांजा कुठून मिळविला व त्याची विक्री कुठे होणार होती याचा पोलीस शोध घेत आहेत.

---------------

Web Title: Four lakh rupees worth of cannabis was seized