चारचाकीचे टायर फुटून दुजाकीवरील ४ जखमी
By Admin | Updated: April 8, 2017 18:27 IST2017-04-08T18:27:16+5:302017-04-08T18:27:16+5:30
चार चाकी वाहनाचा टायर फुटून झालेल्या अपघातात दुजाकीवरील चार जण जखमी झाले़

चारचाकीचे टायर फुटून दुजाकीवरील ४ जखमी
आॅनलाईन लोकमत
राहुरी (अहमदनगर), दि़ ८- चार चाकी वाहनाचा टायर फुटून झालेल्या अपघातात दुजाकीवरील चार जण जखमी झाले़ नगर-मनमाड राज्य मार्गावर गुंजाळ नाक्याजवळ ही दुर्घटना घडली़
देवळाली प्रवरा येथील प्रकाश व संगीता पठारे हे दुजाकीवरील दोघे जखमी झाले़ याशिवाय दुसऱ्या दुचाकीवरील जखमींना राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले़ अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली होती.
शिर्डीवरून राहुरीकडे चारचाकी आलिशान झायलो कार जात होती़ अचानक तिचे टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला़ वाहन दुभाजकवरून विरूद्ध दिशेने गेले़ दुभाजकावरून चार चाकी वाहन गेल्याने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींवर झायलो कार धडकली. अपघातामध्ये दुचाकींचा चक्काचूर झाला़