नगर -औरंगाबाद हायवेवर भीषण अपघात : तिघांचा मृत्यू, २४ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:40 IST2019-02-23T09:42:09+5:302019-02-23T11:40:51+5:30
औरंगाबाद - नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणा-या ट्रॅव्हलने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅव्हलमधील १९ प्रवासी जखमी झाले आहेत.

नगर -औरंगाबाद हायवेवर भीषण अपघात : तिघांचा मृत्यू, २४ जण जखमी
सोनई (नेवासा) : औरंगाबाद -अहमदनगर महामार्गावरील कांगोणी फाट्यााजवळ पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणा-या ट्रॅव्हलने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅव्हलमधील २४ प्रवासी जखमी झाले आहेत. संजय रामकृष्ण सावळे(वय-४० जि.बुलढाणा), आकाश सुरेश यांगड (वय-२७, रा. खंडाळा ता. चिखली, जिल्हा - बुलढाणा), कल्पेश गुलाबराव व्यवहारे( वय-२२, रा. सारोखपीर ता. मौताळा, जि. बुलढाणा) यांचा जागीच मृत्यू झाला.
रॉयल चिंतामणी ट्रव्हल्स कंपनीची बस पहाटेच्या सुमारास पुणेकडे चालली होती. पहाटेच्या सुमारास पुढे चाललेल्या टँकरने ट्रव्हल्सने भरधाव वेगात धडक दिली. शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ललीत पांडुळे यांच्यासह कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींना अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृतांची नावे :
संजय रामकृष्ण सावळे (वय-४० जि.बुलढाणा)
आकाश सुरेश यांगड (वय-२७, रा. खंडाळा ता. चिखली, जिल्हा - बुलढाणा)
कल्पेश गुलाबराव व्यवहारे(वय-२२, रा. सारोखपीर ता.मौताळा, जि. बुलढाणा)
जखमींची नावे :
ज्योती हिवराळे(वय-३७, बुलढाणा)
ज्ञानेश निकाळजे (वय-३८, बुलढाणा)
सुरज गलांडे (जि.बुलढाणा)
प्रेम निकाळजे(बुलढाणा)
महेश बुधीवंत(वाशीम)
छाया सुरवाळे (बुलढाणा)
भरत सावळे (बुलढाणा)
करण सावळे (बुलढाणा)
राजू यांगड ( बुलढाणा)
बेबी यांगड (बुलढाणा)
पावतीबाई गवते (बुलढाणा)
गोपाळा चंगड ( (बुलढाणा)
विघेना झाडे (बुलढाणा)
गोपाल यांगड (बुलढाणा)
पदमाकर इंगळे(बुलढाणा)
विजय गव्हाणे (अमरावती)
अनिता गव्हाणे (अमरावती)
संतोष तुकाराम पुरकर ( ता. मुक्ताईनगर जि.जळगाव)
स्वाती गणेश पाखरे ( पुणे)
स्वाती महेश पठारे (पुणे)
गजानन दत्तात्रय हिंगे
उषा गजानन हिंगे
अनिल परशुराम मोंडवे
रेखा अनिल मोंडवे