राहात्याच्या विकास कामांसाठी चार कोटी

By Admin | Updated: August 31, 2016 00:30 IST2016-08-31T00:21:23+5:302016-08-31T00:30:53+5:30

राहाता : राहाता नगर पालिकेला विविध विकास कामाकरीता राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्षा पुष्पाताई सोमवंशी यांनी दिली.

Four crores for development works | राहात्याच्या विकास कामांसाठी चार कोटी

राहात्याच्या विकास कामांसाठी चार कोटी


राहाता : राहाता नगर पालिकेला विविध विकास कामाकरीता राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्षा पुष्पाताई सोमवंशी यांनी दिली.
सोमवंशी म्हणाल्या, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता नगर पालिकेला विविध विकास कामांकरीता निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने निधी देण्याचे कबूल केले़ याकरीता राहाता नगर पालिकेचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी तातडीने २४ आॅगस्ट रोजी प्रस्ताव सादर केला़ तो एका दिवसात मंजूर करण्यात आला.
सद्यस्थितीला राहाता शहरात चार कोटी रुपयांची विकास कामे सुरु आहे़ यात आणखी नव्या विकास कामाची भर पडणार आहे़ अजुन बरीच विकास कामे राधाकृष्ण विखे व डॉ़ सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे.
शहरात सध्या सुरु असलेली कामे वेगात व शिस्तबध्दरीत्या पूर्ण करण्यात येत असून नव्याने मंजूर झालेल्या निधीतुन शहरातील गटारी, रस्ते व एलईडी दिवे बसवणार असल्याचे नगराध्यक्षा सोमवंशी यांनी सांगितले़
(वार्ताहर)

Web Title: Four crores for development works