शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

चिल्लर घोटाळ्याप्रकरणी चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:11 IST

नगर अर्बन बँकेतील तीन कोटींचा अपहार; इतर आरोपींवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : नगर अर्बन को-ऑप. बँकेतील अडीच कोटी रुपयांच्या चिल्लर अपहार प्रकरणातील गुन्ह्यात शुक्रवारी अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना अटक केली. या गुन्ह्यातील इतर आरोपींवरही लवकरच कारवाई होणार असल्याचे समजते.

अर्बन बँकेचा तत्कालीन मुख्य शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ, मार्केट यार्ड शाखेचा तत्कालीन शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, शाखेतील तत्कालीन कॅशिअर राजेंद्र विलास हुंडेकरी व तत्कालीन पासिंग ऑफिसर स्वप्नील पोपटलाल बोरा अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांना शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुख तथा पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी सांगितले.याप्रकरणी बँकेचे मुख्य शाखाधिकारी मारुती रंगनाथ औटी यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी, घनश्याम बल्लाळ, आशुतोष सतीश लांडगे व इतर संचालकांविरोधात एकूण तीन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. 

काय आहे प्रकरण:आरोपी आशुतोष लांडगे हा अर्बन बँकेचा कर्जदार आहे. त्याचे बँकेत मे. टेरासॉफ्ट टेक्नाॅलॉजी नावाने खाते आहे. या खात्यावर बँकेच्या मार्केटयार्ड शाखेत ऑक्टोबर २०१७ मध्ये तब्बल अडीच कोटी रुपये चिल्लर स्वरूपात भरणा केल्याचे दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात बँकेत हा भरणा झालाच नाही. केवळ आभासी भरणा दर्शविण्यात आला. त्यानंतर बँकेतून पुन्हा लांडगे याच्या संस्थेला कर्ज देण्यात आले. बँकेचे सभासद राजेंद्र गांधी यांनी हा अपहार चव्हाट्यावर आणल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

‘लोकमत’ने वेधले लक्षअर्बन बँकेतील अपहारप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अडीच महिने उलटले तरीतपासाला गती मिळत नसल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करत या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. अखेर पोलिसांनी या गुन्ह्यातील चौघांना अटक केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी