नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 10:23 IST2021-07-04T10:23:08+5:302021-07-04T10:23:39+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील जेष्ठ राजकीय नेते सर्व विषयांचा अभ्यास असलले नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर( वय 70) यांचे रविवारी सकाळी हदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले.

नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांचे निधन
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील जेष्ठ राजकीय नेते सर्व विषयांचा अभ्यास असलले नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर( वय 70) यांचे रविवारी सकाळी हदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले.
प्रा. तुकाराम दरेकर यांना दोन महिन्यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. तुकाराम दरेकर यांनी कोरोनावर मात केली होती. पण हदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली.
प्रा. दरेकर यांचे मागे पत्नी दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.
प्रा. तुकाराम रयत शिक्षण संस्थेत शिपाई पदापासून महाविद्यालयाचे प्राचार्य पदापर्यंत झेप मारली होती.
प्रा. तुकाराम दरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते. तालुक्याच्या राजकारणात त्यांनी आमदार बबनराव पाचपुते यांचे नेतृत्व उभे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तसेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल जगताप यांना आमदार करण्यासाठी पाचपुते यांच्या विरोधात मुठ बांधली होती.
नागवडे साखर कारखान्याचे 10 वर्षे उपाध्यक्ष भुषविले राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश पातळीवर काम केले. तालुक्याच्या राजकारण प्रा तुकाराम दरेकर यांची भुमिका नेहमी लक्षवेधी ठरली.