शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी पक्षातून निलंबित

By अण्णा नवथर | Updated: May 2, 2024 20:34 IST

डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिल्याने कारवाई.

अहमदनगर: शिवसेनेचे माजी आमदार व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी अहमदनगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याचे धोरण घेतल्यामुळे सेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

औटी यांनी महाराष्ट्रदिनी समाज माध्यमांवर आपली भूमिका स्पष्ट करत महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाविरोधात पारनेर येथील शिवसेनेचे पदाधिकारी श्रीकांत पठारे, प्रियंका खिलारी, अनिल शेटे, किसन सुपेकर, भास्कर शिरोळे, बाबाजी तनपुरे आदींनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपण औटी यांच्या निर्णयाच्या सोबत नसून शिवसेनिक हे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या सोबतच असल्याचे जाहीर केले.

औटी यांनी हा निर्णय वैयक्तिक स्वार्थापोटी घेतला आहे, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी गाडे यांनी औटी यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र काढले आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sujay Vikheसुजय विखे