श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ विखे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:12+5:302021-08-27T04:25:12+5:30
लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीचे ते पंचवीस वर्षे सरपंच होते. श्रीरामपूर बाजार समितीचे पाच वर्षे सभापती व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे ...

श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ विखे यांचे निधन
लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीचे ते पंचवीस वर्षे सरपंच होते. श्रीरामपूर बाजार समितीचे पाच वर्षे सभापती व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे पाच वर्षे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. ते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे चुलत भाऊ होते. लोणी बुद्रूक गावाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले. लोणी बुद्रूक येथे गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विखे, नंदकिशोर राठी, विश्वासराव कडू, अशोकशेठ असावा, सरपंच कल्पना मैड, सरपंच जनार्दन घोगरे यांच्यासह प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते.
काशिनाथ विखे फोटो