कोरोना काळातील कर माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:39+5:302021-09-25T04:21:39+5:30

कर्जत : नगर पंचायतीने शहरातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे कोरोना काळात आकारलेले विविध कर माफ करावेत, अशी मागणी शहर भाजपने मुख्याधिकारी ...

Forgive the Corona period tax | कोरोना काळातील कर माफ करा

कोरोना काळातील कर माफ करा

कर्जत : नगर पंचायतीने शहरातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे कोरोना काळात आकारलेले विविध कर माफ करावेत, अशी मागणी शहर भाजपने मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना निवेदन देऊन केली आहे.

मार्च २०२० पासून सर्वत्र कोरोनाचे संकट आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कर्जत शहरातील व्यवसाय बंद आहेत. यामुळे व्यापारीबांधव आर्थिक संकटात सापडले आहेत. नगर पंचायतीने ज्या व्यापारीबांधवांकडे विविध प्रकारचे कर थकले आहेत, अशांना नोटिसा बजावल्या आहेत. वसुलीसाठी २५ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नगर पंचायतीने घेतलेला निर्णय व्यापारीबांधवांसाठी अन्यायकारक आहे. तरी गेल्या दोन वर्षांतील कर माफ करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

निवेदनावर शहराध्यक्ष वैभव शहा, अनिल गदादे, विनोद दळवी, गणेश क्षीरसागर, सचिन पोटरे, राजेंद्र येवले, पुरुषोत्तम भिसे, शरद म्हेत्रे, धनंजय आगम, कृष्णा क्षीरसागर, आदित्य भोज, आफताफ सय्यद आदींच्या सह्या आहेत.

---

२४ कर्जत बीजेपी

कर्जत शहर भाजपच्या वतीने नगर पंचायतीला करमाफीबाबतचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Forgive the Corona period tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.