घाटशिरसला जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST2021-01-08T05:09:21+5:302021-01-08T05:09:21+5:30
मोटारसायकलची चोरी अहमदनगर : श्रीरामपूर शहरातून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी घडली. याबाबत नवनाथ मुरलीधर गडाख (वय ...

घाटशिरसला जबरी चोरी
मोटारसायकलची चोरी
अहमदनगर : श्रीरामपूर शहरातून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी घडली. याबाबत नवनाथ मुरलीधर गडाख (वय ४५, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गडाख यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एमएच १७ बीएफ २२४७) श्रीरामपूर येथील स्वयंकर मंगल कार्यालयाजवळून चोरी गेली.
-----------
स्पेअर पार्टची चोरी
अहमदनगर : दुचाकी गाडीचे स्पेअर पार्ट चोरी झाल्याची घटना राहाता तालुक्यातील केलवड शिवारात घडली. याबाबत दर्गेश तुकाराम शिंदे (रा. इंदोर) यांनी फिर्याद दिली. शिंदे हे शिर्डी ते निघोज जाणाऱ्या बायपास रोडने जात असताना त्यांच्याकडे असलेले २५ हजार रुपये किमतीचे दुचाकी गाडीचे स्पेअर पार्ट चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------
मंदिर दानपेटीतून १७ हजारांची चोरी
अहमदनगर : तेलकुडगाव (ता. नेवासा) येथील चैतन्य नागनाथ मंदिराच्या दानपेटीतून १७ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी रात्री घडली. याबाबत मंदिराचे पुजारी एकनाथ पातळे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंदिरात साखळदंडाने दानपेटी बांधून ठेवली होती. चोरट्याने ही दानपेटी चोरून नेली.