टाकळीभान येथील अन्नछत्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:14+5:302021-05-28T04:16:14+5:30

श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथील प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख व भाजपचे युवा तालुका उपाध्यक्ष नारायण काळे यांनी एक ...

Food shelter at Taklibhan | टाकळीभान येथील अन्नछत्रास

टाकळीभान येथील अन्नछत्रास

श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथील प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख व भाजपचे युवा तालुका उपाध्यक्ष नारायण काळे यांनी एक महिन्यापासून चालविलेल्या अन्नछत्राला प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. अन्नछत्र हे इतरवेळी सर्वत्र सुरू असतात. भूक नसताना चालविले जातात. सध्या कोरोना महामारीमुळे देवस्थान व धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक गरजूंची उपासमार सुरू आहे. अशा वेळी भुकेल्यांना दोन घास देण्याचे काम टाकळीभान येथे अन्नछत्राच्या माध्यमातून सुरू आहे. या कामाचे अनुकरण सर्वत्र व्हावे, असे आवाहन मंत्री बच्चू कडू यांनी केले.

याप्रसंगी प्रहारचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, कृष्णा सातपुते, ज्ञानेश्वर सांगळे उपस्थित होते. अन्नछत्राचा २० हजारांपेक्षा अधिक गरजूंनी लाभ घेतला. मंत्री बच्चू कडू यांनी मुंबईहून कारने ३०० किलोमीटर प्रवास करीत अन्नछत्रास भेट दिली.

----------

Web Title: Food shelter at Taklibhan