पद्मशाली फाउंडेशनच्या वतीने गरजूंना अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:46+5:302021-09-14T04:25:46+5:30
कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून जीवन जगणेही कठीण बनले आहे. माणुसकीच्या नात्याने आपण सर्वांनी एकजुटीने या संकट ...

पद्मशाली फाउंडेशनच्या वतीने गरजूंना अन्नदान
कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून जीवन जगणेही कठीण बनले आहे. माणुसकीच्या नात्याने आपण सर्वांनी एकजुटीने या संकट समयी उभे राहिले पाहिजे. अनेक असे कुटुंब आहेत जे भटकंती करून आपले जीवन जगतात. कोरोनामुळे भटकंती करता येत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. ही स्थिती ओळखून पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांना मदत करण्यात येत आहे, असे दत्तात्रय जोग यांनी सांगितले. यावेळी गणेश लक्षेट्टी, बाळासाहेब चिलवर, दत्तात्रय मादास, यशवंत वन्नम, राजेंद्र जोग, आकाश जोग, संदीप बोडखे, श्रीकांत म्याना, अमित सुंकी आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. या उपक्रमासाठी विश्वास जोग, संदीप बोडखे, अजय लयचेट्टी, शुभम सूंकी, राजू तडका, आकाश अरकल, गणेश अवधूत, मयूर जिंदम, अनिल अलवाल, श्रीनिवास बुरगुल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन युवराज गुंड यांनी केले, तर आभार शुभम सुंकी यांनी मानले.
-----------
फोटो - १३ पद्मशाली मदत
पद्मशाली सोशल फाउंडेशन व जोग परिवाराच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त डोंबारी समाजातील मुलांना अन्नदान करण्यात आले.