पद्मशाली फाउंडेशनकडून गोसावी समाजाला अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:20 IST2021-05-14T04:20:36+5:302021-05-14T04:20:36+5:30

नगर तालुक्यातील टाकळी काझी शिवारात डवरी गोसावी समाजाची सुमारे ५० पाल आहेत. पालावरील पोरं दारोदार जाऊन बहुरुप्याचं सोंग घेऊन ...

Food donation to Gosavi community from Padmashali Foundation | पद्मशाली फाउंडेशनकडून गोसावी समाजाला अन्नदान

पद्मशाली फाउंडेशनकडून गोसावी समाजाला अन्नदान

नगर तालुक्यातील टाकळी काझी शिवारात डवरी गोसावी समाजाची सुमारे ५० पाल आहेत. पालावरील पोरं दारोदार जाऊन बहुरुप्याचं सोंग घेऊन कला सादर करून पोटाची खळगी भरवतात. मात्र कोरोनामुळे त्यांच्यासाठी लोकांची दारं बंद झाली. शासन, समाजातून मदतीचे हात पुढे आले तर त्यांचे चार दिवस तरी ढकलतील या माणुसकीच्या भावनेतून पद्मशाली सोशल फाउंडेशनचे गणेश लयक्षट्टी यांनी या पालावरील ५० कुटुंबीयांना अन्नदान केले.

याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष संपत म्हस्के, सेंट्रल बँकेचे (दिल्ली) वरिष्ठ अधिकारी बालाजी गोने, तुषार डहारे, उपेक्षित वंचित घटकांचे आधारवड व सामाजिक कार्यकर्ते युवराज गुंड आदी उपस्थित होते. या कुटुंबीयांना एक महिनाभराचे मोफत धान्यवाटप ही केले जाणार आहे, असे गुंडे यांनी सांगितले.

--------

फोटो मेल

१३गोसावी मदत

टाकळी काझी येथील गोसावी समाजाच्या लोकांना पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

Web Title: Food donation to Gosavi community from Padmashali Foundation