अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:30+5:302021-06-16T04:28:30+5:30

तालुक्यातील टाकळीभान येथे गरिबांसाठी मोफत अन्नछत्र या ४३ दिवसांपासून सुरु असलेल्या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. नारायण काळे ...

Food donation is the best donation | अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान

अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान

तालुक्यातील टाकळीभान येथे गरिबांसाठी मोफत अन्नछत्र या ४३ दिवसांपासून सुरु असलेल्या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. नारायण काळे व नवाज शेख यांच्या सहकार्याने यशस्वीपणे उपक्रम राबविला.

महंत रामगिरी म्हणाले, लेने को हरिनाम, देनेको अन्नदान हा उपदेश सराला बेटचे महंत संत गंगागीर महाराज यांनी दिला. त्यांच्या प्रेरणेतून येथे अन्नछत्रासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले. या अविरत सेवेसाठी डॉ. श्रीकांत भालेराव व त्यांच्या कन्या डॉ. सोनल यांनी बहुमोल सहकार्य केले. सांगता समारंभास दत्तात्रय बहिरट, मधू महाराज, बाळासाहेब लोखंडे, प्रा. बाळासाहेब लेलकर, पोपटराव पटारे, मुकुंद हापसे, अर्जुन राऊत, दिगंबर पांडे, भगवान पाडांगळे, नानासाहेब बनकर, वृषभ धोंडलकर, अक्षय थोरात, गौरव बनकर, जिजाराम जाधव, सुरेश बनकर उपस्थित होते.

--------

Web Title: Food donation is the best donation