कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नियम पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:15 IST2021-07-10T04:15:51+5:302021-07-10T04:15:51+5:30
निघोज : निघोज (ता. पारनेर) परिसरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले ...

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नियम पाळा
निघोज : निघोज (ता. पारनेर) परिसरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी निघोज व प्रिंप्री जलसेन येथे शुक्रवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, तालुका आरोग्याधिकारी प्रकाश लाळगे आदी प्रमुख उपस्थित होते. त्यांनी यावेळी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक नियम पाळावेत. कोरोना रुग्णांवर घरी उपचार न करता त्यांना कोरोना सेंटरमध्ये किंवा दवाखान्यात ॲडमीट करावे. लग्न, दशक्रिया विधी किंवा इतर समारंभात गर्दी करू नये. आरोग्य विभागाने कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे, अत्यावश्यक सेवांना सूट असली तरी विनाकारण गर्दी करू नये, दूध संस्थांनी मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत दुग्ध उत्पादकांना सूचना द्याव्यात, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी केले.
निघोज ग्रामपंचायत परिसरात दोन दिवसांपूर्वी तहसीलदार ज्योती देवरे यांनी सरपंच चित्रा वराळ, पंचायत समिती, महसूल, आरोग्य, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांची बैठक घेऊन कंटेन्मेंट झोन घोषित केला होता. उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, अध्यक्ष सचिन वराळ आदी यावेळी उपस्थित होते.
----
निघोजचे गावकरी ऐकत नाहीत..
पंधरा दिवसांपासून निघोज आणि परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कितीही निर्बंध असले तरी निघोज ग्रामस्थ ऐकत नाहीत. तालुक्यातील सर्व गावे एकीकडे व निघोज गाव दुसरीकडे, असा विषय आहे. यामध्ये आता ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांची जबाबदारी मोठी आहे. यापुढे गावकऱ्यांची बेशिस्त खपवून घेणार नाही, असा इशारा तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला.
----
०९ निघोज
निघोज येथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, तालुका आरोग्याधिकारी प्रकाश लाळगे व इतर.