टेम्पोच्या धडकेत फुले विक्रेता ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:40+5:302021-01-23T04:21:40+5:30
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर शिवारातील टोल नाक्यावर नीलेश मेहत्रे व त्याचा भाऊ गोरख मेहेत्रे फुले व ...

टेम्पोच्या धडकेत फुले विक्रेता ठार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर शिवारातील टोल नाक्यावर नीलेश मेहत्रे व त्याचा भाऊ गोरख मेहेत्रे फुले व हार विक्रीचा व्यवसाय करत होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास नगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो (क्र. एम.एच.-१२, आर.एन. १९९९) टोल नाक्यावर बांधण्यात आलेल्या संरक्षक कठड्याला धडकून उलटला. यावेळी कठड्याजवळ हार विकण्यासाठी उभारलेल्या नीलेश मेहत्रे याला जबर मार लागल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी माजी सैनिक राजेंद्र बनकर व रघुनाथ पवार यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाला आहे.
नीलेश मेहेत्रे याच्यावर दुपारी अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. विनोद जाधोर, पी.एस.आय. दीपक पाठक, हवालदार रमेश थोरवे, पोलीस नाईक गणेश कावरे, पो.कॉ.संदीप आव्हाड, पो.कॉ.अनिल पवार यांनी घटनेचा पंचनामा केला. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
फोटो-२२निलेश मेहेत्रे
...