फुलांचा बाजार बहरला

By Admin | Updated: October 23, 2014 14:53 IST2014-10-23T14:53:55+5:302014-10-23T14:53:55+5:30

दिवाळीच्या मंगलमय वातावरणाला प्रारंभ झाला असून, दीपोत्सवानिमित्त बुधवारी शहरात फुलांचा बाजार बहरला होता.

The flower market flourished | फुलांचा बाजार बहरला

फुलांचा बाजार बहरला

अहमदनगर : दिवाळीच्या मंगलमय वातावरणाला प्रारंभ झाला असून, दीपोत्सवानिमित्त बुधवारी शहरात फुलांचा बाजार बहरला होता. गुरुवारी सायंकाळपर्यंत मोठय़ा प्रमाणात फुलांची विक्री होणार आहे. वर्षातील सर्वात मोठा समजल्या जाणार्‍या दिवाळी सणाला घरोघरी लक्ष्मीपूजनासाठी फुलांची खरेदी केली जाते. तसेच घर, दुकान, कार्यालय, व्यवसायाच्या ठिकाणी व वाहनांनाही फुलांचे हार बांधले जातात. त्यामुळे दसरा आणि दिवाळीला फुलांना मोठी मागणी असते. दिवाळीनिमित्त सध्या बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे. झेंडूसह, शेवंती, गलांडा, अष्टर, गुलछडी आणि मोगर्‍याच्या फुलांना मोठी मागणी आहे. बाजारात विक्रमी आवक होवूनही फुलांचे दर वाढले असून, बुधवारी सकाळी झेंडूची फुले ८0 ते १00 रुपये प्रतिकिलो विकले गेले. इतर फुलांचा दर यापेक्षाही वाढीव आहे. नगरच्या बाजारपेठेत शेवगाव, नेवासा, संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा व श्रीरामपूर तालुक्यातून फुलांची मोठी आवक होते. शहरात दिल्लीगेट, अमरधाम, जुने बसस्थानक, झोपडी कॅन्टीन, मंगळवार बाजार व सावेडी परिसरात फुलांची विक्री केली जाते. व्यापारी तसेच अनेक शेतकरी थेट रस्त्यावर बसून फुले विकतात. दिवाळीनिमित्त फुलांचा दोन दिवसांचा सिजन असतो. दोन दिवसांत ३५ ते ४0 लाख रुपयांची उलाढाल फूलविक्रीतून होते.

Web Title: The flower market flourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.