२८६० किलो वजनाचा ध्वजस्तंभ
By प्रदीप.गरड | Updated: September 27, 2017 17:09 IST2017-09-27T17:06:28+5:302017-09-27T17:09:25+5:30
शिर्डी: साई समाधी शताब्दीचे प्रतिक असलेल्या व तब्बल २८६० किलो धातू वापरून बनविलेल्या व सुवर्ण झळाळी असलेल्या ध्वजस्तंभाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे़

२८६० किलो वजनाचा ध्वजस्तंभ
प्रमोद आहेर
शिर्डी: साई समाधी शताब्दीचे प्रतिक असलेल्या व तब्बल २८६० किलो धातू वापरून बनविलेल्या व सुवर्ण झळाळी असलेल्या ध्वजस्तंभाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे़.
१ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या ध्वजावर शताब्दीचा ध्वज फडकाऊन सोहळ्याचा श्रीगणेशा होत आहे़ साईसंस्थानच्या प्रतिष्ठेला साजेसा ध्वज बनविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे़ या ध्वज स्तंभाची उंची ५१ फूट आहे. त्यावर नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या लेंडीबागेत डौलात फडकणारा दहा फूट लांब व पंधरा फूट रूंदीचा विशालकाय ध्वज भाविकांचे लक्ष वेधून घेईल. शताब्दीचा ध्वज भगव्या रंगात आहे. त्यावर मध्यभागी साईबाबांची प्रतिमा व श्रद्धा, सबुरी हा संदेश तसेच शताब्दीचे बोधचिन्ह असेल. वरील व खालील बाजूस साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव २०१७-१८ असा मराठी व इंग्रजीत उल्लेख असेल़
सार्इंना सुवर्ण सिंहासन देणारे भाविक आदिनारायण रेड्डी यांच्या देणगीतून हा ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे़ या स्तंभात २१०० किलो वजनाचा लोखंडी खांब, त्यावर ७६० किलो पितळेचे आकर्षक वेष्टन तयार करण्यात आले आहे़ साई पद्मालय मेटल आर्ट अॅँड क्राफ्टचे रा़ अलगाराजा सतपती हे कारागिर या स्तंभाची उभारणी करीत आहेत. कोपरगावचे योगेश पाटील यांनी सिव्हील वर्कचे काम केले आहे़
१५ बाय १५ चौरस फुटाच्या आरसीसी बांधकामाच्या चौथºयावर हा स्तंभ उभारण्यात आला आहे. स्तंभाचा बैठा भाग ९ बाय ९ फूट आकाराचा आहे़ स्तंभाच्या वर ‘ओम’ आहे. त्यावर ‘त्रिशुल’ची प्रतिकृती आहे़ स्तंभाच्या चौथºयावरील भागावर चारही बाजूंनी सार्इंच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत़ १८ सप्टेंबरपासून या स्तंभाचे काम सुरू झाले आहे. २४ सप्टेंबरला यावरील ‘ओम व त्रिशुल’ ची साई मंदिरात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली़ यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, अभय शेळके, आदिनारायण रेड्डी आदी उपस्थित होते़ ध्वजाच्या परिसरात पाण्याचे नवीन धबधबे तयार करण्यात येत आहेत़.