शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना अटक,दोन फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:36 IST2018-06-19T16:36:15+5:302018-06-19T16:36:54+5:30
नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ परिसरात असलेल्या शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण खात्याला यश आले़ अन्य दोन दरोडेखोर पळून गेले.

शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना अटक,दोन फरार
राहुरी : नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ परिसरात असलेल्या शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण खात्याला यश आले़ अन्य दोन दरोडेखोर पळून गेले.
१८ जुन रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खब-यामार्फत दरोडेखोर दरोड्याच्या तयारीत असल्याची माहीती मिळाली़ त्यानुसार शनि शिंगणापूर फाटा येथे गुन्हे आन्वेषण विभागाने छापा टाकला. त्यामध्ये सादीक शेख, संतोष कांबळे, शाबीर सय्यद, अन्वर मन्सुरी, सागर कांबळे, एकनाथ सोनवणे, बबलू शहा (सर्व राहणार श्रीरामपुर) हे सर्वजण दरोड्याच्या तयारीत होते.
गुन्हे आन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकल्यानंतर दरोडेखोरांकडे मिरची पुड, धारधार शस्त्र, तलवार कोयता, मिरचीची पुड, मोबाईल आढळून आले. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पाच जणांना पकडण्यात यश आले.अन्य दोघे एकनाथ सोनवणे व बबलू शहा हे दोघे इंडिका कारमधून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
अहमदनगर स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे मनोहर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस उपनिरीखक लक्ष्मण भोसले हे करीत आहेत.