पाच दरोडेखोर ताब्यात : श्रीरामपूर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:50 IST2019-06-18T18:48:11+5:302019-06-18T18:50:30+5:30
शिरसगाव हद्दीत रेल्वे उड्डानपुलाखाली अंधारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच तरुणांना शहर पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांच्याकडे हत्यारे व दरोड्याचे साहित्य मिळून आले.

पाच दरोडेखोर ताब्यात : श्रीरामपूर पोलिसांची कारवाई
श्रीरामपूर : शिरसगाव हद्दीत रेल्वे उड्डानपुलाखाली अंधारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच तरुणांना शहर पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांच्याकडे हत्यारे व दरोड्याचे साहित्य मिळून आले.
आरोपींमध्ये अक्षय रजनीकांत मकासरे (वय २२, भानसहिवरा, ता.नेवासे), अजय विजय खंदारे (वय २०, सिद्धार्थनगर, श्रीरामपूर), अक्षय बाबासाहेब खंडागळे (वय२०, भीमनगर), संदीप जगन साठे (गोंधवणी), विजय गुलाब अढांगळे (भीमनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.