राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाच जणांची निवड
By Admin | Updated: August 24, 2014 23:07 IST2014-08-24T22:54:23+5:302014-08-24T23:07:51+5:30
भिंगार : छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी भिंगार हायस्कूलच्या पाच मुलांची निवड झाली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाच जणांची निवड
भिंगार : छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी भिंगार हायस्कूलच्या पाच मुलांची निवड झाली आहे. १५ ते १८ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य अँथलेटीक्स, पुणे बालेवाडी येथील स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कास्य पदकाची कमाई केली आहे.
पुणे बालेवाडी महाराष्ट्र राज्य अॅथलेटीक्स स्पर्धेत श्रद्धा वामन तीन हजार मीटर, तर सुवर्णा कापसे तीन कि. मी. धावणे प्रकारात सुवर्ण, प्रियांका पारखे तीन कि. मी., अभिषेक साळुंके पाच कि. मी. धावणे प्रकारात रौप्य, तनुज बचाटे याने ५ कि. मी. धावणे प्रकारात कास्य पदकाची कमाई केली आहे. छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. गुणवंत खेळाडूंची खाण म्हणून भिंगार हायस्कूलची ओळख आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक रमेश वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. (वार्ताहर)