टँकर, दुचाकी आणि रिक्षाचा विचित्र अपघात;पाच जखमी

By Admin | Updated: February 26, 2017 16:49 IST2017-02-26T16:49:36+5:302017-02-26T16:49:36+5:30

पाण्याचा टँकर, दुचाकी आणि अ‍ॅटोरिक्षांत झालेल्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले

Five people injured in tanker, bike and auto rickshaw | टँकर, दुचाकी आणि रिक्षाचा विचित्र अपघात;पाच जखमी

टँकर, दुचाकी आणि रिक्षाचा विचित्र अपघात;पाच जखमी

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26 - पाण्याचा टँकर, दुचाकी आणि अ‍ॅटोरिक्षांत झालेल्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले. यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. सर्व जखमींना घाटीत दाखल करण्यात आले असून एकाजणाची प्रकृती चिंताजनक आहे.हा भीषण अपघात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नंदनवन कॉलनीत घडला.
 उर्मिला आबासाहेब थोरात(३५), सारिका आबासाहेब थोरात(२०), आबासाहेब थारोत, (४०), स्नेहल आबासाहेब थोरात(१६) आणि दिव्यांगी दिलीप इंगळे(२१)अशी जखमींची नावे आहेत. यावेळी प्रसंगावधान राखून दुचाकीचालक तरुणाने दुचाकी सोडून बाजूला उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला.
याविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अशोक गंगावणे यांनी सांगितले की, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्याने भरलेला टँकर (क्रमांक एमएच-०४ एजी १८७८)हा नंदनवन कॉलनीतून उतारावरून पुढे जात होता.याचवेळी विरुद्ध दिशेने आबासाहेब थोरात आणि त्यांचे नातेवाईक रिक्षाने (क्रमांक एमएच-२०बीटी ६३७२)शहराकडे जोरात येत होते. आणि दुचाकीचालकही (क्रमांक एमएच-२०ईएस ७६४९)शहराकडे निघाला होता. यावेळी अचानक उतारावरील टँकरचालक अचानक गोंधळला आणि तो थेट रिक्षाला धडकला. या विचित्र अपघातात थारोत कुटुंबासह दिव्यांगी इंगळे ही तरुणीही गंभीर जखमी झाली. यावेळी ट्रकचालक आपल्या अंगावर येत असल्याचे लक्षात येताच दुचाकीस्वाराने दुचाकी सोडली आणि त्याने बाजूला उडी मारल्याने तो बालंबाल बचावला. परंतु त्याच्या दुचाकी मात्र टँकरखाली आल्याने चुरडा झाली.
छावणी पोलिसांचे युद्धपातळीवर मदतकार्य अपघाताची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अशोक गंगावणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लोकांच्या मदतीने सर्व जखमींना एका वाहनातून घाटीत पाठविले.

Web Title: Five people injured in tanker, bike and auto rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.