गोमांस विक्री प्रकरणी पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:20 IST2019-05-10T12:19:45+5:302019-05-10T12:20:07+5:30

गोमांसांची विक्री सुरू असलेल्या पाच ठिकाणी शहर पोलिसांनी गुरुवारी कारवाई करुन सुमारे साडेसातशे किलो मांस जप्त केले.

Five people arrested in beef sales case | गोमांस विक्री प्रकरणी पाच जणांना अटक

गोमांस विक्री प्रकरणी पाच जणांना अटक

संगमनेर : गोमांसांची विक्री सुरू असलेल्या पाच ठिकाणी शहर पोलिसांनी गुरुवारी कारवाई करुन सुमारे साडेसातशे किलो मांस जप्त केले. मोगलपुरा परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
जहिर इर्शाद कुरेशी (वय ३५, रा.भारतनगर), रशिद सुलतान कुरेशी (वय ३८, रा.मोगलपुरा), शेहबाज गुलफाम कुरेशी (वय २७, रा.मोगलपुरा), उमर शकरू कुरेशी (वय ३७, रा.मोगलपुरा), मुर्शरफ बशीर कुरेशी (वय ३०, रा. मोगलपुरा, सर्व रा. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक अभय परमार पथकासह सदर ठिकाणी गेले असता त्यांना मोठ्या प्रमाणात गोमांसांची विक्री होत असल्याचे निर्देशनास आले. विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मासांची विक्री करणारे अनेक जण पोलीस आल्याचे पाहून पळून गेले. मोगलपुरा परिसरातील पाच ठिकाणाहून सुमारे साडेसातशे किलो गोवंशाचे मांस जप्त करण्यात आले. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे, पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे, सहायक फौजदार राजा गायकवाड, पोलीस नाईक अमित महाजन, पोलीस कॉँस्टेबल सागर धुमाळ, महादेव हांडे, प्रमोद गाडेकर, धनंजय महाले, अमृत आढाव आदींचा समावेश होता. पोलीस निरीक्षक परमार पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Five people arrested in beef sales case