पाच किलोमीटर पाठलाग : अवैध दारूसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:59 IST2018-09-04T16:58:36+5:302018-09-04T16:59:01+5:30
अवैध दारुची वाहतूक करणा-या वाहनाचा पाठलाग करत राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने १० लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

पाच किलोमीटर पाठलाग : अवैध दारूसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त
नागापूर : अवैध दारुची वाहतूक करणा-या वाहनाचा पाठलाग करत राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने १० लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धनंजय लगड, प्रविण साळवे, बी. एम. चत्तर यांच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार राहुरी तालुक्यातील ताहराबाद रोडवर सापळा रचला. अवैध दारू वाहतुक व विक्री करणा-या (एम.एच-१५, डीएस- ०८३४) या वाहनाचा पाच किलोमीटर पाठलाग केला. पाठलागानंतर आरोपी बाबूराव पाडूंरंग डोलनर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० लाख २० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.