दोन अपघातांत पाच ठार

By Admin | Updated: October 10, 2016 01:07 IST2016-10-10T01:00:51+5:302016-10-10T01:07:27+5:30

पाथर्डी/अकोले (जि. अहमदनगर) : पाथर्डी आणि अकोले तालुक्यात दोन वेगवेगळ््या झालेल्या अपघातांत पाच जण ठार झाले. हे दोन्ही अपघात रविवार घडले.

Five killed in two accidents | दोन अपघातांत पाच ठार

दोन अपघातांत पाच ठार

 

पाथर्डी/अकोले (जि. अहमदनगर) : पाथर्डी आणि अकोले तालुक्यात दोन वेगवेगळ््या झालेल्या अपघातांत पाच जण ठार झाले. हे दोन्ही अपघात रविवार घडले. पाथर्डी तालुक्यातील तिसगावकडून शेवगावकडे जाणारी इनोव्हा कार (एम. एच. १२़ जेझेड ६३४५) व पाथर्डीकडून आलेली मारुती कार (एम. एच. १६़ आऱ ८५४) यांच्यामध्ये कासारपिंपळगाव येथील महाविद्यालयासमोरील चौफुल्यावर जोरदार धडक झाली़ या अपघातात मारुती कारमधील गंगाधर दादा भगत (वय ७०), अर्जुन सुखदेव राजळे (वय ४०, दोघेही रा. कासारपिंपळगाव) व मारुती आंबेकर (वय ५५, रा. अहमदनगर) हे तिघे ठार झाले़ तर मारुती कारमधील धुराजी राजळे हे जखमी झाले़ हा अपघात रविवारी दुपारी घडली. अपघातात मारुती कारचा चक्काचूर होऊन कारचे दोन भाग झाले. जखमी राजळे यांना नगरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले़ अपघात झाल्यानंतर इनोव्हा गाडीतील सर्वजण पसार झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरूहोते. तीस फूट दरीत टेम्पो कोसळून दोन ठार, २१ जखमी दुसरा अपघात रविवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास कोतूळपासून वीस किलोमीटर अंतरावर येसरठाव येथे रविसारी सायंकाळी घडला. पुणे जिल्ह्यात भाजीपाला विक्रीसाठी जाणारा टेम्पो तीस फूट दरीत कोसळला. या अपघातात लीलाबाई लक्ष्मण धराडे (वय ४५, येसरठाव) व दादाभाऊ जोशी (वय ३५, सातेवाडी) हे दोघे जागीच ठार झाले. तर धोंडिबा दिघे (७५, सातेवाडी), बाळू दिघे (४०), संजय दिघे (३२), महेश नाडेकर (१५), रामदास धिंदळे (३०), चंद्रकांत दिघे (४०), सुरेश मुठे (४५), नीलेश मुठे (३०), एकनाथ दिघे (५०), पांडुरंग दिघे (६०), किसन नाडेकर (२५), अमृता वाळे (४५), संजय कचरे (३५), सोमनाथ बारे (३०), सुशील साळुंके (२५), लिंबा बारे (५०), जालिंदर कचरे (४०), काशिनाथ मुठे (५०), कुंडलिक धिंदळे (६२), तर एक अनोळखी महिला, असे २१ जण जखमी झाले. यातील १५जणांना लोणी, संगमनेर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले, तर इतरांवर कोतूळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील सातेवाडी, खेतेवाडी, पळसुंदे या आदिवासी भागांतील शेतकरी टेम्पोतून भाजीपाला घेऊन ओतूर (जि. पुणे) येथे विक्रीसाठी निघाले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कोतूळ ग्रामीण रुग्णालयात डॉ. संजय घोगरे, डॉ. भागवत कानवडे, डॉ. सतीश पोरे, आरोग्यसेविका ऊर्मिला रोकडे, शिंदे यांनी जखमींवर उपचार केले. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र अहिरे, सहायक फौजदार सुनील साळवे आदींनी जखमींची भेट घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलातील निवृत्त अधिकारी मधुकर जगधने यांनी तातडीने सहायक फौजदार सुनील साळवे यांना कळविले. त्यानंतर १५ मिनिटांत ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी नेण्यास मदत केली.

Web Title: Five killed in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.