कोपरगावात शनिवारी पाच बाधित रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:22+5:302021-01-17T04:18:22+5:30

कोपरगाव : कोपरगावात शनिवारी (दि.१६ जानेवारी) रॅपिड अँटिजन कीटद्वारे एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्यात या व्यक्तीचा अहवाल नकारात्मक ...

Five infected patients were found in Kopargaon on Saturday | कोपरगावात शनिवारी पाच बाधित रुग्ण आढळले

कोपरगावात शनिवारी पाच बाधित रुग्ण आढळले

कोपरगाव : कोपरगावात शनिवारी (दि.१६ जानेवारी) रॅपिड अँटिजन कीटद्वारे एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्यात या व्यक्तीचा अहवाल नकारात्मक आला. १४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. खासगी लॅब ३, नगर अहवाल २, एकूण ५ व्यक्ती बाधित आढळल्या. १२ व्यक्तींच्या घशातील स्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

१६ जानेवारीअखेर २८२२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला, तर सध्या ४३ बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. २७३५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यातील १९ हजार ५४५ व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ हजार ३९० व्यक्तींची नगर येथे स्राव पाठवून, तर १५ हजार १५५ व्यक्तींची रॅपिड अँटिजन कीटद्वारे तपासणी करण्यात आल्याचे डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.

Web Title: Five infected patients were found in Kopargaon on Saturday