आगीत पाच गायींचा मृत्यू
By Admin | Updated: May 20, 2016 00:28 IST2016-05-20T00:21:28+5:302016-05-20T00:28:56+5:30
सोनई : सोनईजवळील कांगोणीरोडवर असणाऱ्या हनुमानवाडी शिवारात विद्युत तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत पाच गायींचा मृत्यू झाला.

आगीत पाच गायींचा मृत्यू
सोनई : सोनईजवळील कांगोणीरोडवर असणाऱ्या हनुमानवाडी शिवारात विद्युत तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत पाच गायींचा मृत्यू झाला. तर पाच गायी गंभीर भाजल्या आहेत. ही दुदैवी घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडली़
हनुमानवाडी येथील सुधीर जनार्दन शेटे यांच्या शेतातून विद्युत वाहक तारा गेल्या आहेत़ या तारांमध्ये गुरुवारी दुपारी घर्षण झाले़ या घर्षणामुळे आगीची ठिणगी जनावरांच्या चाऱ्यावर पडली़ या चाऱ्याने पेट घेतला़ काही क्षणातच या आगीने जवळच असलेल्या गायींच्या गोठ्याला वेढले़ यात पाच जर्सी गायी, एका कालवडीचा मृत्यू झाला़ तर आठ जनावरे गंभीर भाजली आहेत़ आगीची माहिती समजताच मुळा साखर कारखान्यावरुन अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाले़ मात्र, पाणी अपुरे पडल्याने आग आटोक्यात येऊ शकली नाही़
जनावरांची दावे तोडून काही जनावरांना वाचविण्यात यश आले़ घटनेची माहिती समजताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, माजी उपसरपंच दादासाहेब वैरागर, अप्पा शेटे, बाळासाहेब गोसावी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ़ मेहेत्रे आदींनी घटनास्थळी धाव घेतली़ या घटनेत शेटे यांची सहा जनावरे, गोठा, जनावरांचा चारा असे मिळून सुमारे ८ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे़ (वार्ताहर)