कार पळविणारे पाच जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST2021-03-18T04:20:41+5:302021-03-18T04:20:41+5:30

राजेंद्र बाबासाहेब राऊत ऊर्फ राजन बाबूराव मुजुमुल (वय. २६, रा.परतूर, जि. जालना), पांडुरंग ऊर्फ ओम बबन वैद्य (वय. २४, ...

Five car hijackers arrested | कार पळविणारे पाच जण ताब्यात

कार पळविणारे पाच जण ताब्यात

राजेंद्र बाबासाहेब राऊत ऊर्फ राजन बाबूराव मुजुमुल (वय. २६, रा.परतूर, जि. जालना), पांडुरंग ऊर्फ ओम बबन वैद्य (वय. २४, रा.जोगदंड मळा, जालना), मोहम्मद इरफान मलिक (वय २४, रा.पडेगाव, कासमवली दर्गा, औरंगाबाद), विशाल संजय जोगदंड (वय २०, रा.जोगदंडमळा, जालना), भागवत ऊर्फ संभ्या बालाजी राऊत (वय २०, रा. जोगदंडमळा, जालना), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

७ फेब्रुवारीला अतुल नाथा मिंडे (वय ३६, धंदा कारचालक, रा. शिंदे, पो. वसुली, ता. खेड, जि. पुणे) हे शिर्डीमार्गे निळवंडे शिवारातून कारने (एम. एच.१४, जे.एच. ८२०७) या पाच जणांना घेऊन जात होते. या पाच जणांनी चालक मिंडे यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यांना मारहाण करून त्यांना निळवंडे शिवारात रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. त्यानंतर हे पाच जण कार व मोबाइल घेऊन पळून गेले. स्थानिकांना मिंडे जखमी अवस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी मिंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कार चोरी करणाऱ्या पाच जणांना जालना येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कार, दोन गावठी कट्टे, चाकू असा एकूण १० लाख ०२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक फौजदार विजय खंडीझोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब औटी, पोलीस नाईक शिवाजी डमाळे, पोलीस नाईक राजेंद्र घोलप, पोलीस नाईक ओंकार शेंगाळ, वाहन चालक मनोज पाटील, पोलीस नाईक ज्योती दहातोंडे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Five car hijackers arrested