पाचेगाव परिसरात साडेपाच इंच पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:56+5:302021-06-29T04:15:56+5:30
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव, गोणेगाव, इमामपूर परिसराला सलग दुसऱ्या दिवशी आर्द्राच्या पावसाने झोडपले. सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ...

पाचेगाव परिसरात साडेपाच इंच पाऊस
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव, गोणेगाव, इमामपूर परिसराला सलग दुसऱ्या दिवशी आर्द्राच्या पावसाने झोडपले. सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास आलेला पाऊस सात वाजेपर्यंत सुरू होता. दोन दिवसात साडेपाच इंच पाऊस झाला.
या पावसाने परिसरातील ओढ्या-नाल्यांना यंदा पहिल्यांदाच पूर आला होता. अनेक शेतातील बांध फुटले. अनेक शेतात ठिकठिकाणी पाणी साचून तळे साचले होते तर गावातील अनेक कुटुंबाच्या घरातही पाणी शिरले. गावातील सर्वच रस्त्यावरून पाणी वाहत होते.
सोमवारी दोन तासात धुवांधार पडलेल्या पावसाची ७० (३ इंच) मिलिमीटरपेक्षा अधिक नोंद झाली. रविवारी देखील पाचेगावात ५७ (सव्वादोन इंच) मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. दोनच दिवसात १२७ मिलिमीटर (साडेपाच इंच) पाऊस झाल्याने परिसरातील शेतकरी सुखावला आहे. १ जूनपासून ते २८ जूनपर्यंत तब्बल २०० मिलिमीटर (८ इंच) पावसाची नोंद झाली असून जून महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली आहे.
---
२८ पाचेगाव पाऊस
पाचेगाव शिवारात झालेल्या पावसाने शेतातून वाहणारे पाणी.