नेवाशात प्रथमच फुलले कमळ

By Admin | Updated: October 20, 2014 10:53 IST2014-10-20T10:53:45+5:302014-10-20T10:53:45+5:30

सत्ताधार्‍यांच्या गाफिलपणाचा फायदा भाजपाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी उठविला. त्यामुळे तालुक्याच्या इतिहासात प्रथमच कमळ फुलले.

For the first time in the Nevasa flower lily | नेवाशात प्रथमच फुलले कमळ

नेवाशात प्रथमच फुलले कमळ

पंचरंगी वाटणार्‍या या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे उमेदवार मतविभाजन होऊन सरळ विजय मिळेल, या भ्रमात राहिले. सत्ताधार्‍यांच्या या गाफिलपणाचा फायदा भाजपाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी उठविला. त्यामुळे तालुक्याच्या इतिहासात प्रथमच कमळ फुलले.
 
विश्लेषण
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून पाचव्या फेरीपर्यंत बाळासाहेब मुरकुटे यांना मताधिक्य होते. मात्र, सहाव्या फेरीला गडाख यांनी बाजी मारली. सातव्या व आठव्या फेरीला पुन्हा मुरकुटेंनी मताधिक्य मिळविले. ९ ते १३ व्या फेरीपर्यंत गडाख मताधिक्य मिळविण्यात यशस्वी ठरले. मात्र, १४ ते १८ व्या फेरीपर्यंत मुरकुटे यांनी गडाखांचे मताधिक्य घटवून कमळाचे मताधिक्य वाढविले. आणि १९व्या फेरीला गडाख १00 मतांनी पुढे गेले. अतिशय दोलायमान लढतीत अंतिम क्षणी मुरकुटे यांनी आघाडी घेत विजय मिळविला. 
 
 नेवासा : भाजपाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांची नेवासा शहरातून उघड्या जीपमूधन विजयी मिरवणूक काढण्यात आली. ढोल, ताशाचा गजर आणि भंडार्‍याची उधळण
भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे, काँग्रेसचे दिलीप वाकचौरे हे दोन उमेदवार वगळता इतर उमेदवारांनी मतमोजणी केंद्राकडे जाण्यासाठी निरुत्साह दाखविला. मतमोजणी केंद्राबाहेर भाजपा कार्यकर्त्यांची पहिल्यापासूनच मोठी गर्दी होती. ही गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली. भाजपाच्या कार्यकर्ते मोठय़ा संख्येने मतमोजणी केंद्राबाहेर जमले होते. शेवटच्या क्षणी धनगर समाजाने भंडार्‍याची उधळण करीत जल्लोष केला. तर कार्यकर्त्यांनी ढोल, ताशे वाजवून आंनद साजरा केला. गडाखांच्या भ्रमाचा भोपळा फुटला
सुरुवातीला पंचरंगी वाटणारी नेवासा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात दुरंगी झाली. प्रथम पंचरंगी वाटणार्‍या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकरराव गडाख गाफिल राहिले. याचा फायदा उठवित मुरकुटे यांनी ४६५९ मतांचे मताधिक्य घेत या निवडणुकीत मुसंडी मारली. त्यामुळे तालुक्याच्या इतिहासात प्रथमच कमळ फुलले. नेवासा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षासह आकरा उमेदवार उभे होते. राष्ट्रवादीचे उमेदवार शंकरराव गडाख, भाजपाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, काँग्रेसचे उमेदवार दिलीप वाकचौरे, शिवसेनेचे उमेदवार साहेबराव घाडगे, मनसेचे उमेदवार दिलीप मोटे यांनी आपापल्या पद्धतीने प्रचारास प्रारंभ केला. नेवासा तालुक्यात केलेले विकास कामे व पाण्यासाठी दिलेला लढा गडाख यांनी प्रचारातून जोरदारपणे मांडला. विकासाचा मुद्दा उपस्थित करीत गडाख यांनी मते मागितली. तर घाडगे व मुरकुटे यांनी गडाख यांच्यावर तोफ डागत मतदारसंघात विकासाचा भूलभुलैया सुरु असल्याची टीका केली. पंचरंगी लढतीत मतांचे विभाजन होऊन सहज विजय होईल, या भ्रमात गडाख गाफिल राहिले. मात्र, शेवटच्या टप्प्यात काँग्रेस, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी तलवार म्यान केली. त्यामुळे या मतदारसंघात प्रारंभी पंचरंगी वाटणारी लढत गडाख व मुरकुटे यांच्यातच झाली. परिणामी मतविभाजन होऊन सरळ विजय होईल, या भ्रमात असलेल्या गडाख यांच्यापुढे तोपर्यंत मुरकुटे यांनी तगडे आव्हान उभे केले होते. विरोधकांच्या मतविभागणीचा फायदा आम्हालाच होईल, असा तर्क राष्ट्रवादीतून केला जात होता. तर मुरकुटेंनी मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नांचा मुद्दा मतदारांसमोर जोरदारपणे मांडण्यावर भर दिला. मतदारांना प्रश्न पटवून देण्यात ते यशस्वी झाले. गावोगावचे कार्यकर्ते जोडण्यावर मुरकुटे भर देत होते. वारकरी असलेल्या मुरकुटे यांनी या निवडणुकीत 'जय हरी'चा नारा घरोघर पोहोचविला. सामान्यांचा प्रतिनिधी मीच असल्याचे मतदारांवर बिंबविण्यात मुरकुटे यशस्वी झाले. त्यामुळेच गडाख यांच्याविरोधात जनमत तयार करुन मतात रुपांतरित करण्याची किमया मुरकुटे यांनी साधली. मतमोजणीच्या १९ व्या फेरीपर्यंत दोलायमान असणार्‍या या निवडणुकीत मुरकुटे यांनी अखेरीस ४ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळविला. मुरकुटे यांच्यामुळे नेवासा तालुक्यात प्रथमच कमळ खुलले. मुरकुटेंनी रविवारी एकादशी असल्याने संत ज्ञानेश्‍वर मंदिरात जावून 'पैस' खांबाचे दर्शन घेतले आणि समस्त वारकर्‍यांना जय हिंद म्हणत नमस्कारही केला. पंचरंगी वाटणार्‍या या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे उमेदवार मतविभाजन होऊन सरळ विजय मिळेल, या भ्रमात राहिले. सत्ताधार्‍यांच्या या गाफिलपणाचा फायदा भाजपाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी उठविला. त्यामुळे तालुक्याच्या इतिहासात प्रथमच कमळ फुलले. 
विश्लेषण विजय भंडारी

Web Title: For the first time in the Nevasa flower lily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.