नेवाशात रंगले पहिले रिंगण

By Admin | Updated: June 24, 2014 00:05 IST2014-06-23T23:45:50+5:302014-06-24T00:05:25+5:30

नेवासा : राज्यात शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे सोमवारी (दि़२३) सायंकाळी संत ज्ञानेश्वरांच्या पुण्यभूमीत आगमन झाले. आषाढी वारीतील पहिला रिंगण सोहळा

The first redone in the necklace | नेवाशात रंगले पहिले रिंगण

नेवाशात रंगले पहिले रिंगण

नेवासा : राज्यात शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे सोमवारी (दि़२३) सायंकाळी संत ज्ञानेश्वरांच्या पुण्यभूमीत आगमन झाले. आषाढी वारीतील पहिला रिंगण सोहळा भागवत धर्माची भगवी पताका हातात घेवून ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत साजरा केला. हा सोहळा पाहण्यासाठी नेवासे एस. टी. स्टॅण्डच्या प्रांगणात हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे हे ४०वे वर्ष आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजता दिंडीच्या प्रस्थानापूर्वी श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्तपिठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रयासह श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या पालखीचे व त्यांच्या समाधीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले़ पालखीच्या स्वागतासाठी देवगड येथील गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाचे झांज व लेझीम पथक पालखी दिंडीत सहभागी झाले होते.
खांद्यावर भगवी पताका, पांढरा पोषाख, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर पांढरी टोपी परिधान केलेले वारकरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करीत अग्रभागी होते़ त्यांच्यामागे भजनी मंडळ, छत्रपती शिवरायांची वेशभूषा केलेले शिवभक्त सारंगधर पानकडे, चांदीच्या पुष्पांनी सजविलेल्या रथामध्ये किसनगिरी बाबांची प्रतिमा व प्राकृत पादूका त्यामागे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करणाऱ्या महिला भाविक असे देवगड दिंडीचे स्वरुप होते.
देवगड फाटा येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, विश्वास गडाख, पी. आर. जाधव आदींनी दिंडीचे केले़
खडकामार्गे ही दिंडी नेवासे येथे आली असता एस. टी. स्टँड प्रांगणात परंपरेनुसार आषाढी वारीतील पहिले रिंगण टाळमृदुंगाच्या गजरात करण्यात आले. छत्रपती शिवरायांची वेषभूषा करुन शिवभक्त सारंगधर पानकडे यांनी अश्वाचे रिंगण सादर केले. सुधीर चव्हाण यांनी महाराष्ट्र गीतावर अश्वरिंगण केले. एस. टी. महामंडळाचे जिल्हा नियंत्रक सुरेश संवत्सरकर, आगार प्रमुख सतिष बंदरे, सतिष कुलकर्णी यांच्या हस्ते पालखीची विधीवत पूजा करण्यात आली. तर बदामबाई धनराज गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मृणालिनी मुळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी मराठमोळी वेषभूषा करुन ‘चंद्रभागेच्या तिरी’ या भक्तीगितावर नृत्य सादर केले.
भास्करगिरी महाराज यांचा तहसीलदार हेमलता बडे, भानुदास मुरकुटे, एसटी महामंडळाचे जिल्हा नियंत्रक सुरेश संवत्सरकर, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, कामगार संघटनेचे दिलीप दहातोंडे, शरीफ शेख, कामगार सेनेचे बाळासाहेब जोंधळे, भाऊसाहेब आव्हाड, बी. डी. तनपुरे, आगार व्यवस्थापक सतिष बंदरे, प्रवासी संघटनेच्या वतीने अनिल ताके, होमगार्डचे तुकाराम राजगिरे यांनी सत्कार केला. नेवासे शहरात दिंडीचे आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने नितीन जगताप, जालिंदर गवळी, भाजपच्या वतीने शहराध्यक्ष संदिप आलवणे, यांनी स्वागत केले़ नेवासा येथील संभाजी चौकात मुथ्था परिवाराच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना फराळ व वाटप करण्यात आले. चालक-मालक संघटना, दुर्गादेवी तरुण मंडळानेही दिंडीचे स्वागत केले. देवगड दिंडीचा पहिला मुक्काम संत ज्ञानेश्वर मंदिरात होता. रात्री भास्करगिरी महाराजांचे किर्तन झाले. मंगळवारी (दि़ २३) दिंडीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: The first redone in the necklace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.